Vidhansabha Mantrimandal Profile

आमदार डॉ विजयकुमार कृष्णराव गावित

आमदार

  • मतदारसंघ 3 नंदुरबार विधानसभा मतदार संघ
  • राजकीय पक्ष भाजपा
  • संपर्क 8888722314 /(02564) 223061
  • ईमेल drvkgavitrdb@gmail.com
  • स्विय श्री शरद राठोड - 8888565817

Social Profile On

जीवन परिचय

आमदार श्री डॉ.विजयकुमार कृष्णराव गावित यांचा जन्म 15 ऑगस्ट 1955 साली लोभानी,ता.तळोदा ,जिल्हा नंदुरबार येथे झाला.श्री गावित यांनी एम.बी.बी.एस., एम.डी. पर्यंत वैद्यकीय शिक्षण घेतले आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सक्रिय, समाजसेवी, एकनिष्ठ नेता म्हणून त्यांची ओळख आहे. श्री गावित विधान सभा निवडणूक 2024मध्ये नंदुरबार विधान सभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टी पक्षा कडून निवडून आले असून ते 1999 पासून श्री गावित देव मोगरा शिक्षण संस्था चे अध्यक्ष आहेत. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना मदत, योग्य विषयी जागृती शिबिराच्या आयोजन केले आहेत. त्यांनी नंदुरबार जिल्हा निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले असून सामाजिक संस्था मार्फत व आदिवासी विकास प्रकल्प मार्फत आदिवासींच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न शील होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय विद्यार्थी संघटना आणि आदिवासी विकास संघटना या संस्थाचे सल्लागार होते. 1985 मध्ये मागासवर्गीय डॉक्टर संघटना चे उपाध्यक्ष होते.1999-2014 मध्ये 2014 पासून भारतीय जनता पक्षा मध्ये सहभागी होऊन झाले.1995, 1999, 2004, 2009,2014,2019,2024 मध्ये विधानसभेवर सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा 1997 ते 1999 यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे राज्यमंत्री पदाचा पदभार होता. आणि 2001- 2002 मध्ये त्यांच्याजवळ सामान्य प्रशासन, समाज कल्याण, दारूबंदी प्रचार खात्याचे राज्यमंत्री पदाचा पदभार होता. जुलै 2002 ते जुलै 2004 मध्ये यांच्याकडे सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क व व्यसनमुक्ती कार्य खात्याचे राज्यमंत्रीपदाचा पदभार होता. 2004 पर्यंत त्यांच्याजवळ सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, भटक्या विमुक्त जाती व इतर मागासवर्ग कल्याण व राजशिष्टाचार यासह 2004 पासून व्यसनमुक्त कार्य राज्यमंत्री पदाचा पदभार होता. 2004 ते 2009 मध्ये त्यांच्याजवळ आदिवासी विकास खात्याचे मंत्री पदाचा पदभार होता. नंतर 2009 ते 2014 मध्ये, यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण,फलोत्पादन व पर्यटन खात्याचे कॅबिनेट मंत्री पदाचा पदभार होता. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲप च्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा

Personal Information


नाव :
आमदार डॉ विजयकुमार कृष्णराव गावित

शिक्षण :
एम. बी. बी. एस., एम. डी.(मेडिसीन).

जन्मदिवस :
1955-08-15

मतदार संघ :
3 नंदुरबार विधानसभा मतदार संघ

राजकीय पक्ष :
भाजपा

जिल्हा :
नंदुरबार

पद :
आमदार

संपर्क :
8888722314 /(02564) 223061

ईमेल :
drvkgavitrdb@gmail.com

निवासस्थान :
विरळ विहार कॉलनी, खोडाई माता रोड, नंदुरबार, जिल्हा नंदुरबार-425 412

कार्यालय:
विरळ विहार कॉलनी, खोडाई माता रोड, नंदुरबार, जिल्हा नंदुरबार-425 412

स्विय:
श्री शरद राठोड - 8888565817

अवगत भाषा :
मराठी,हिंदी, इंग्रजी, भील व अहिराणी.

Follow On:

कार्यालयाचे पत्ता

विरल विहार कॉलनी खोडेमाता रोड नंदुरबार जिल्हा नंदुरबार


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD