Vidhansabha Mantrimandal Profile

आमदार श्री अमित विलासराव देशमुख

आमदार

  • मतदारसंघ लातूर मतदार संघ
  • राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  • संपर्क 9870633333 ; (022) 22023478,; 22023479
  • ईमेल
  • स्विय

Social Profile On

जीवन परिचय

आमदार श्री अमित विलासराव देशमुख यांचा जन्म 21 मार्च 1976 ला मुंबई येथे झाला.त्यांनी बी.ई.(केमिकल )पर्यंत शिक्षण घेतले.विधान सभा निवडणूक 2024 मध्ये लातूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा कडून निवडून आले आहेत.ते माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे पुत्र असून 1997 पासून युवक काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ता होते. 2000 पासून विकास सहकारी साखर कारखाना लिमिटेड,चे अध्यक्ष आहेत,हा साखर कारखान्यात सात वर्षात राज्यस्तरीय 9 पुरस्कार प्राप्त, तसेच,आय एस ओ व पर्यावरण नामांकन मिळवणारा देशातील एकमेव कारखाना आहे. 2002 व 2008 मध्ये श्री देशमुख महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. नंतर ते सांगली व सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी झाले. आणि लातूर मतदार संघातून लोकसभा व विधानसभा निवडणूक च्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावली. २००२ मध्ये विकास कॉपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ते संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. 2008 पासून ते विकास को-ऑपरेटिव्ह ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड चे स्थापक आणि अध्यक्ष सुद्धा आहेत. 2008 मध्ये लातूर तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष होते. 2006 मध्ये कृषी उत्पन्न समितीचे निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरीब कुटुंबेतील व्यक्तींना वेळोवेळी त्यांची मदत असते. तरुणांना मार्गदर्शन शिबिर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकासासाठी वक्तृत्व स्पर्धा चे आयोजन आणि युवकांसाठी विविध उद्योग, व्यवसाय, शेती पूर्वक व्यवसाय,जोडधंदा, कृषी यांत्रिकरण, दुग्ध व्यवसाय या,सारखे रोजगार उपलब्ध करून देऊन बेकारी कमी करण्याचा श्री देशमुख यांनी सतत प्रयत्न केला.त्यांनी वेळोवेळी महिला , अल्पसंख्याक , मागास व इतर मागासवर्गीयांना विकासासाठी विशेष प्रयत्न केले. ते 2009, 2014,2019,2024 विधानसभा मध्ये सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2014 2018 पर्यंत पर्यटन, अन्न व औषध प्रशासन,राज्य उत्पादन शुल्क, नवीन व नवीकरण ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री चा पदभार त्यांच्याजवळ होता. 2019 मध्ये शिक्षण व सांस्कृतिक कार्य कॅबिनेट मंत्री पदाचा पदभार त्यांनी सांभाळला होता.त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा .

Personal Information


नाव :
आमदार श्री अमित विलासराव देशमुख

शिक्षण :
B.E.(camical)

जन्मदिवस :
1976-03-21

मतदार संघ :
लातूर मतदार संघ

राजकीय पक्ष :
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

जिल्हा :
लातूर

पद :
आमदार

संपर्क :
9870633333 ; (022) 22023478,; 22023479

ईमेल :

निवासस्थान :
मु.पो. बाबळगाव, तालुका जिल्हा लातूर

कार्यालय:
(022) 24972222 ; 22024700 ; 22025736

स्विय:

अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्रजी

Follow On:

कार्यालयाचे पत्ता

पूर्णा वरळी सागर सहकारी गृहनिर्माण संस्था, सर पोचखान वाला मार्ग,वरळी मुंबई,


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD