Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ अहमदपुर
- राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट )
- संपर्क 9158175151 ; (02381)220031
- ईमेल bmpatil51@gmail.com
- स्विय
जीवन परिचय
माननीय, नामदार मंत्री महोदय श्री बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील यांचा जन्म 5 डिसेंबर 1958 साली शिरूर -ताजबंद, तालुका अहमदपूर, जिल्हा -लातूर येथे झाला त्यांनी बी.ए पर्यंत शिक्षण घेतले असून . माननीय मंत्री महोदय श्री बाबासाहेब पाटील यांच्या जवळ सध्या महायुती सरकारमध्ये सहकार खात्या चा मंत्रीपदाचा पदभार आहे. त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले कामे उल्लेखनीय असून . त्यांनी बाळ भगवान शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थीसाठी के.जी. ते पी.जी. पर्यंतच्या शिक्षणाची सोय केली . शिरूर ताजबंद येथे महिलांसाठी अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र सुरू केले, मुंबई नांदेड सह अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालय सुरू केले, आणि मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी उर्दू शाळा पण सुरू केल्या, माननीय श्री पाटील, महेश मंदिर ट्रस्ट शिरूर ताजबंद चे अध्यक्ष आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ चे सदस्य आणि सिनेट मेंबर होते.त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत काही भव्य आयोजन केले त्यांनी पत्रकार व शिक्षक गौरव सन्मान कार्यक्रमाचे आयोजन, वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन,शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी प्रयत्न,आणि शेतकऱ्यांना 36 कोटी विमा मिळून दिला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत दिली, विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराच्या आयोजन केले, सिद्धी शुगर कारखाना सुरू केला, महेश बँकेची स्थापना केली , महेश सहकारी पतसंस्था सुरू केली, शिरूर येथे वस्त्र उद्योग सुरू केला, शिरूर- ताजबंद येथे 14 कोटीची पाणीपुरवठा योजना सुरू केली , आणि अहमदपूर चाकूर तालुक्यात विविध विकास कामांना भरीव निधी मंजूर करून आणली. दोन्ही तालुक्यात विकास कामे जोरात केली. अहमदपूर शहरात म्हाडा अंतर्गत 200 घराची उभारणी केली , ट्रॉमा केअर सेंटर मंजूर केले, लिंबोटी धरणावरील , उर्धवा प्रकल्प अंतर्गत पंधरा वर्षापासून रखडलेली उपसा जलसिंचन योजना सुरू करून अहमदपूर तालुक्यातील सहा हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणली. त्यांनी 15 वर्ष सदस्य व पाच वर्ष उपाध्यक्ष जिल्हा परिषद लातूर कार्य केले. ते पाच वेळा संचालक व एक वेळा अध्यक्ष लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून कार्य केले. यांना कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या "वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी " पुरस्काराने सन्मानित केले. 2009,2014,2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभाचे सदस्य म्हणून त्यांची निवडून आले होते २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली .माननीय मंत्री श्री बाबासाहेब पाटील हे मा.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे खंबीर समर्थक असून एक समाजसेवक, सक्रिय आणि एकनिष्ठ राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन