Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ सोलापूर दक्षिण
- राजकीय पक्ष भाजपा
- संपर्क 8007575859 ; 9923333344 ; 8007575859
- ईमेल bapu.ssd@gmail.com ; solapurward@gmail.com
- स्विय श्री विकास रायमाने -9422294061
जीवन परिचय
आमदार श्री सुभाष सुरेशचंद्र देशमुख यांचा जन्म 12 मार्च 1957 वडाला तालुका, उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर येथे झाला. त्यांनी एस.एस. सी. पर्यंत शिक्षण घेतले.विधान सभा निवडणूक 2024मध्ये सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टी पक्ष कडून निवडून आले असून ते सक्रिय सामाजिक कार्यकर्ता आहे. त्यांनी समाजासाठी सामाजिक बांधिलकी जपता कार्य करून आपलं योगदान दिले आहे. श्रीराम संशोधन व विकास प्रतिष्ठान, वडाला उत्तर सोलापूर चे संस्थापक आहेत. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ त्याचे सदस्य आहेत. तसेच त्यांनी सोलापूर येथे कृषी विद्यालय सुरू केले, बायोटेक्नॉलॉजी विद्यालय सुरू केले, सोलापूर मध्ये विद्यापीठ युथ फेस्टिवल व अविष्कार संमेलनाचे आयोजन केले, विश्वविक खते निर्माते प्रयोगशाला सुरू केली.अनेक संस्थांचे,चेअरमन सदस्य आणि संस्थापक आहेत. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था चे सदस्य आणि संचालक आहेत. श्री देशमुख वेळोवेळी समाजातील दुर्बल घटकांना मदत , आर्थिक दुर्बल व्यक्तींना व्यवसायासाठी प्रत्येक योग्य ते मदत करून उद्योगासाठी प्रोत्साहन देतात ,पुस्तकांचे संघटन करून प्रशिक्षणाची सोय व अनेक छोट्या उद्योग उद्योगांच्या उभारण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन देतात,त्यांनी लोकमंगल जलसंधारणा योजना,लोकमंगल आरोग्य योजना सुरू केली लोकमंगल उद्योजकता विकास केंद्र तसेच लोकमंगल वृक्ष संरक्षण योजना सुरू केली,त्यांनी लोकमंगल शिक्षक रत्न पुरस्कार सुरू केला आरोग्य तपासणी शिबिर केले,रक्तदान शिबिर आयोजन केलं त्यांना समाजासाठी त्यांच्या द्वारा केले गेलेले कार्यांसाठी वेग वेगळे पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. त्यांना सामाजिक कार्य बद्दल ,2010 मध्ये रोटरी क्लब सोलापूर तर्फे रोटरी "सामाजिक सेवा प्रतिज्ञाता"पुरस्कार ,डॉ. हेडगेवार रक्तपेढी सोलापूर तर्फे "रक्तदान सन्मान "पुरस्कार ,"भीम उद्योग गौरव " ,जय हिंद परिवार पुणे तर्फे " ग्रामीण उद्योजक्ता पुरस्कार","मानव भूषण पुरस्कार" तसेच " गौरव महाराष्ट्र "पुरस्काराने सन्मानित केले गेले आहेत. 2011बिझनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशन सांगलीतर्फे " सहकार श्री " पुरस्कार, 2012"मराठवाडा भूषण " पुरस्कार 2013 ला जिजाऊ उत्सव समिती उस्मानाबाद तर्फे " राजश्री महाराज समाज भूषण " पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. 2002-3 ते भारतीय जनता पक्ष सोलापूर जिल्ह्या अध्यक्ष होते नंतर ते उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष झाले केंद्रीय सहकार आघाडी भारतीय जनता पक्षाचे सदस्य झाले ,संसदीय स्थायी समितीचे सदस्य झाले नंतर ते भारतीय जनता पक्ष महासंपर्क अभियान प्रमुख म्हणून पण त्यांनी काम केले .1998-2004मध्ये महाराष्ट्र विधानसभा वर निवडून आले . 2004 ते 2018 काळात ते लोकसभा खासदार होते. नंतर 2014, 2019,2024 विधानसभा मध्ये सलग तीन वेळा आमदार असून . 2016 ते 2019 सह मदत पुनर्वसन खात्याचे कॅबिनेट मंत्री पदाचा पदभार त्यांच्याजवळ होता यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधींॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन