Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ गुहागर विधानसभा मतदारसंघ
- राजकीय पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
- संपर्क 9422429911 ; (02355) 253271
- ईमेल bhaskarjadhav07@gmail.com
- स्विय
जीवन परिचय
आमदार श्री भास्कर भाऊराव जाधव यांचा जन्म 1ऑगस्ट 1957 साली तोंडली पिलवली -चिपळूण, जिल्हा- रत्नागिरी इथे झाला. त्यांनी अकरावीपर्यंत शिक्षण घेतले असून विधान सभा निवडणूक 2024मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, मतदारसंघातून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून निवडून आलेले आमदार आहेत. त्यांनी केलेले सामाजिक कार्य उल्लेखनीय असून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी "प्रबोधनकार ठाकरे शाळांत परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमाला" व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराच्या आयोजन केले. आणि ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. गोरगरिबांना, दुर्बलांना सहाय्य, चिपळूण येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले. 1993 मध्ये महामार्गाच्या क्रमांक 17 दुरुस्तीसाठी आंदोलनाचे नेतृत्व केले. कोंकणातील पर्यटन विकासासाठी सतत प्रयत्नशील राहिले. मच्छीमारांसाठी कल्याणकारी बोर्ड स्थापन केले. कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य व विज्ञान विद्यापीठ व्हावे, तसेच स्वतंत्र शैक्षणिक विद्यापीठ व्हावे यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही पंचायत समिती पासून करून ते चिपळूण पंचायत समिती त्याच्या सदस्य होते. ते 1992-1995 सदस्य आणि विरोधी पक्षनेते, जिल्हा परिषद चे होते. ते ग्राहक वस्तू भंडार चिपळूण येथे सदस्य होते. विविध कार्यकारी सेवा, सहकारी संस्था, चिपळूण याचे सल्लागार होते. चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सतत त्यांचे प्रयत्नशील राहिले. चिपळूण मधील पूरग्रस्तांना त्यांनी मदत केली.1982 पासून शिवसेनेचे कार्य हाती घेतले.1986 मध्ये शिवसेनेचे विभाग प्रमुख राहिले .1989 मध्ये एसटी कामगार सेना चिपळूण त्याचे अध्यक्ष होते.1990 मध्ये भारतीय कामगार सेना, कोकण विभाग त्याचे चिटणीस होते. 2019 मध्ये शिवसेना मध्ये सहभागी होऊन 2006-9 महाराष्ट्र विधान परिषद चे सदस्य होते.1995, ,1999,2004, 2009, 2014-2019,2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. सन 1999-2000 या वर्षाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचा " उत्कृष्ट भाषण " पुरस्कार श्री भास्कर जाधव यांना प्राप्त झाला . 2009 ते 2013 मध्ये नगर विकास, वने, बंदरे, खार जमिनी, संसदीय कार्य, क्रीडा व युवक कल्याण आणि माजी सैनिकाचे कल्याण विधी व न्याय, मत्स्य व्यवसाय खात्याचे राज्यमंत्रीपदाचा पदभार त्यांच्याजवळ होता. तसेच ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पण होते. 2014 मध्ये कामगार व विशेष सहाय्य खात्याचे मंत्री होते. ते सक्रिय, कर्मठ, एकनिष्ठ, समाजसेवक नेते आहेत. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲप च्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन