Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ मिरज
- राजकीय पक्ष भाजपा
- संपर्क 9850508980, 9420206666
- ईमेल sureshkhade1000@gmail.com
- स्विय श्री वैभव नलावडे 9881914999, 7769015007
जीवन परिचय
आमदार डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडे , यांचा जन्म 1 जून 1958 पेड तालुका -तासगाव, जिल्हा सांगली येथे झाला. त्यांनी अभियांत्रिकी, डि.लीट . पर्यंत उच्च शिक्षण घेतले. श्री विधान सभा निवडणूक 2024मध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज मतदारसंघातून भारतीय जनतापक्षातून निवडून आलेले आमदार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आणि समाज कार्यामध्ये त्यांचा योगदान उल्लेखनीय आहेत. त्यांनी दात बहुउद्देशीय शिक्षण संस्था चे अध्यक्ष आणि संस्थापक आहे. या संस्थेमार्फत मिरज येथे इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केले. आय.एम. एस. व आय.पी.एस. च्या विद्यार्थ्यांना पुस्तके आर्थिक मदत केली अनेक शैक्षणिक संस्थांना संगणक संच दिले.गरीब ,होतकरू विद्यार्थ्यांना शालोउपयोगी साहित्याचे मदत केली. जत साखर कारखान्याच्या माध्यमातून दुष्काळात चारा छावणी सुरू केली. अनेक गावात स्वखर्चाने बोरवेल बसविल्या, टॅंकरने पाणीपुरवठा केला. जत तालुक्यातील इंदिरा आवास योजना अंतर्गत संपूर्ण घरांसाठी स्वखर्चाने साहित्य पुरवले. शहीद जवानांच्या कुटुंबियांना अर्थसहायताद्वारे वैयक्तिक मदत केली. 2013-15 मध्ये ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष होते त्यांनी पूरस्थिती पूरग्रस्तांना तसेच गरीब निराधार महिलांना आर्थिक सहाय्यता केले आपदाग्रस्तांना मदत केली. दलित, अपंगांना तसेच गरीब रुग्णांना औषधी उपचारांसाठी मदत केली. बहु संस्था चे अध्यक्ष आणि चेअरमन म्हणून त्यांनी समाज उपयोगी कार्य केले .1999-2003 मध्ये जत दुष्काळीत भागाला म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्याचे कृष्णा नदीचे पाणी मिळावे यासाठी अनेक वेळा धरणे, मोर्चे व आंदोलने केली.भूमी संपादनाबद्दल शेतकऱ्यांना भरपाई मिळवून दिली. रस्त्याचा बॅकलॉग भरून काढला. जत तालुक्याचे विभाजन करून नवीन उमदी तालुका करावा यासाठी आंदोलनाचे नेतृत्व केले,आश्रम शाळा विकासासाठी प्रयत्न केले. जात येथे जागतिक बँकेच्या सहाय्याने उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केला. मूकबधिर विद्यालयांना मदत केली.ते 2004, 2009,2014,2019,2024 मध्ये विधानसभेत सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले ते अंदाज समिती , पंचायत राज समिती, अनुसूचित जाती कल्याण समिती व उपविधान समितीचे सदस्य होते. 2015-2019 मध्ये अनुसूचित जाती कल्याण समिती चे समिती प्रमुख झाले.2019 मध्ये सामाजिक न्याय व मदत सहाय्य खात्याचे मंत्री चा पदभार त्यांच्याजवळ होता. एकनिष्ठ नेते, सक्रिय, कर्तबगार, समाजसेवी असे नेता आहेत. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲप च्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन